"Ruchira"
पुण्यात नवी पेठ विठ्ठल मंदिरा जवळ माझी आत्याआज्जी राहायची. त्यांच्या सासूबाई म्हणजे श्रीमती कमलाबाई ओगले . एके दिवशी त्यांचा घरी गेलो असताना, महाशिवरात्रीचा उपवास असल्याने त्यांनी मला साबुदाण्याची खिचडी, वराईचे तांदूळ- दाण्याची आमटी, राजगिरा लाडू असा फराळ खायला दिला. मी खूप लहान असल्याने, आपण मराठी घराघरात पोहोचलेच्या एवढ्या थोर व्यक्तिमत्वाचा सान्निध्यात असल्याचे मला माहीतही नव्हते.
त्यांच्या स्वयंपाक घरात, डाईनिंग टेबलवर बसून फराळ खाताना; सुंदर आयोजन केलेले डबे, रेखीव प्लेट्स आणि "रुचिरा" या पुस्तकावर माझी नजर गेली आणि माझी आणि रुचिरा पुस्तकाची पहिली ओळख झाली.
त्यानंतर आमच्या घरात सणावाराला किंवा पाहुणे घरी येणार असले कि रुचिराचे दोन्ही भाग हमखास कपाटातून बाहेर निघायचे. अगदी जीर्ण झालेली पाने जणू एखाद्या पोथीप्रमाणे वाटायची आणि पोथी वाचून अन्नदेवतेचा रुचकर प्रसाद मिळायचा.
बऱ्याच वर्षाने २०१० मध्ये , मी हॉटेल मॅनेजमेन्ट ची पदवी प्राप्त करून, मुंबईच्या ओबेरॉय हॉटेलच्या किचन मध्ये नोकरी करू लागलो. तेव्हा मास्टरशेफ इंडियाचे परीक्षक शेफ विकास खन्ना यांच्याशी भेटण्याचा योग आला. ते भारतातील विविध राज्यातील पारंपरिक खाद्यसंस्कृती या विषयीचे अन्वेषण करत असल्याने, महाराष्ट्रीयन पाककृतींसाठी त्यांना मी रुचिरा पुस्तकाचे दोन्ही भाग दिले. ते आता त्यांचा संग्रही आहेत.
फेसबुक वरील रुचिरा विदेशींनी या ग्रुपवरही कमलबाई ओगले यांच्या पाककृती पाहताना, पुन्हा पुन्हा रुचिरा या पुस्तकातील "समाधानाचा जन्म स्वयंपाकघरात होतो " या वाक्याची आठवण होते.
आजही पारंपरिक मराठी पाककृती म्हंटले कि आपसूकच रुचिराचि पाने उलगडतात आणि अन्नपूर्णा प्रसन्न होते.
त्या साबुदाणा खिचडीची आठवण म्हणून, हा माझा नम्र प्रयत्न .. https://youtu.be/tE5nYj3MNh0
- शेफ धवल करंदीकर .
Sabudana khichadi | साबुदाणा खिचडी
Preparation time:10 minutes
Soaking time: Overnight
Cooking time: 20-25 minutes
Serving: 2
Ingredients:
• 1 cup Sabudana / Sago seeds
• 1 tbsp Ghee
• 1/2 tsp Cumin seeds
• 2-3 finely chopped Green chillies
• 1/2 cup Roasted Peanut powder
• Salt to taste
• A pinch of Sugar (Optional)
• Finely chopped Coriander leaves- to garnish
Method:
• Wash the sabudana 3-4 times well with running water.
• Soak the sabudana in water for 1-1 1/2 hours. Drain the water
soak overnight.
• In the morning if you find the sabudana dry, stir it with spoon
or fork and add 2-3 tbsp water.
• Mix well and keep it aside.
• Heat ghee in a pan. Add cumin seeds. Let it pop up.
• Add green chillies, soaked sabudana, roasted Peanut powder,
salt and sugar. Mix well.
• Cook on medium heat for 3-4 minutes.
• Cover and cook for another 3-4 minutes. Remove the lid and
mix well.
• Add coriander leaves. Mix well. You can add lemon juice if you
like.
• Sabudana khichadi is already.
• It tastes good as it is or goes fantastic with cucumber raita.
Comments
Post a Comment